Dharmaveer 2 Movie Review: पुन्हा एकदा हिंदूत्ववादी "आनंदा"ची गोष्ट, कसा आहे धर्मवीर 2...
Review(4.5 / 5)
धर्मवीर प्रमाणे धर्मवीर 2 ला देखील प्रेक्षकांकडून भरभरू प्रेम मिळालेलं पाहायला मिळत आहे. धर्मवीरमध्ये पाहायला मिळाल्याप्रमाणे आनंद दिघे यांच्या जीवनगाथेचा प्रवास धर्मवीरमध्ये पाहायला मिळाला होता. याआधी बहुतांश लोकांना आनंद दिघे यांच्या कारकिर्दीबाबत माहित असेल मात्र धर्मवीर या चित्रपटाने आनंद दिघेंना पुन्हा लोकांच्या मनात जिवंत केलं. यामध्ये मोठा वाटा हा प्रसाद ओक यांचा आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रसाद ओक यांनी धर्मवीर आणि धर्मवीर 2 या दोन्ही चित्रपटांमध्ये जीव ओतला आहे. त्यांच्या अभिनयाने आनंद दिघेंच्या असण्याची भावना निर्माण केली आहे. तर यावेळी मात्र धर्मवीर 2 चा प्रचार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला आहे. मात्र काही लोकांनी धर्मवीर 2 बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रपटातले कलाकार आणि पात्र:
प्रवीण तरडे दिग्दर्शक धर्मवीर 2 या चित्रपटात राजकीयवर्तूळातील पात्र मराठी सिनेसृष्टीतील कलाकार साकारताना दिसले आहेत. यामध्ये काही पात्र हे जूनेच असून आता त्यात काही नवीन पात्राची जोड करण्यात आलेली आहे. जुन्या पात्रामध्ये असलेले प्रसाद ओक हे धर्मवीर 2 मध्ये देखील हिंदूत्ववादी आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसत आहेत. त्याचप्रमाणे क्षितीश दाते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसत आहे. तर स्नेहल तरडे अनिता बिर्जेच्या भूमिकेत दिसत असून बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत मकरंद पाध्ये हेच दिसत आहेत. याशिवाय काही अभिजीत खांडकेकर, विजय चव्हाण, सुनील तावडे, आनंद इंगळे, हृषीकेश जोशी, उदय सबनीस, सुरेश विश्वकर्मा, समीर धर्माधिकारी, राजेश भोसले, कमलाकर सातपुते, अजय जाधव, सुनिल बर्वे, सचिन नारकर, मंगेश देसाई हे देखील राजकीय पात्रात पाहायला मिळाले आहेत.
चित्रपटाची कथा:
या चित्रपटाची कथा दोन साधूंच्या हत्येपासून होते. हे साधू भगव्या रंगाच्या वस्त्रात आढळून येतात ज्यामुळे एकनाथ शिंदे पेटून उठतात. या घटनेनंतर या चित्रपटाला सुरुवात होते त्यानंतर एकनाथ शिंदेना पुढे काय करावे याबद्दल काही सुचेनास होतं आणि यावेळी त्यांना आनंद दिघेंची एक प्रतिमा दिसते आणि त्यावेळी ते एकनाथ शिंदेंना भगव्याचे आणि हिंदुत्वाचे महत्त्व सांगतात. तसेच यानंतर शिवसेनेचे एक वेगळे रुप पाहायला मिळते आणि कॉंग्रेसच्या आघाडीत शिवसेनेत असणाऱ्या नेत्यांची होणारी घुसमट दाखवली गेली आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटात आहे. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले, शहाजीबापू पाटील, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई यांचे पात्र चित्रपटात पाहायला मिळतील. मात्र या चित्रपटात शिवसेना आणि इतर पक्षातले सर्व पात्र दाखवले असले तरी शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि आताच्या मविआतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटातील नेत्यांचे पात्र वगळण्यात आलेले आहेत.
चित्रपटाचा रिव्ह्यू:
हा छित्रपट राजकीयपातळीवर बनवण्यात आला आहे असं म्हटलं जात आहे. तर यामध्ये कॉंग्रेसच्या आघाडीत शिवसेना नेत्यांची घुसमट दाखवण्यात आलेली आहे. धर्मवीर हा चित्रपट संपुर्णपणे आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्वावर होता. मात्र धर्मवीर 2 हा आनंद दिघे नव्हे तर एकनाथ शिंदे यांच्यावर काढला आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच या चित्रपटात 40 टक्के आनंद दिघे यांच्याबद्दल दाखवण्यात आलेलं आहे तर 60 टक्के एकनाथ शिंदेबद्दल दाखवण्यात आलेलं आहे. या चित्रपटाला आतापर्यंत 4.5 एवढा रेट मिळाला आहे तर धर्मवीर 2 ने बॉक्स ऑफिसवर 1.65 करोड एवढ कलेक्शन केलेलं पाहायला मिळत आहे.